लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले राज्य! आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या वतीने संसदेसारख्या ठिकाणी आपली मते मांडण्याचं काम करतात,ही गोष्ट वारंवार आपल्याला सांगितली जाते.त्यामुळे पाच वर्षातून एकदा जाऊन बोटाला निळी शाई लावली की आपले कर्तव्य संपले,अशी बहुसंख्य हिंदू समाजाची मानसिकता निर्माण झालेली आहे. पण आपण निवडून दिलेल्या प्रतीनिधीवर आपल्या मताचे ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी त्याला आपल्या हितासाठी योग्य तेच निर्णय घेण्यासाठी आपण भाग पाडले पाहिजे,ह्याकडे आपण नेहमीच कानाडोळा करत आलोय.कदाचित याच गोष्टीमुळे २०१३ सालापर्यंत वक्फ बोर्डासारखे अन्यायकारक कायदे आपल्या अंगावर जबरदस्ती थोपवण्यात आले.
तेव्हाचा काळ सोशल मीडियाचा नव्हता असं म्हणून आपल्या चुकांवर पांघरूण घालणं,हे सोयीस्कर असल तरी झालेल्या चुकांचा पाढा वाचत बसण्यापेक्षा झालेल्या चुका दुरुस्त करण्यात का होईना आपला हातभार लागला पाहिजे,ह्याकडे प्रत्येकाने लक्ष देणं अत्यंत गरजेचे आहे.हीच संधी आता तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य लोकांकडे स्वतःहून चालून आली आहे.
२०१३ साली संविधानात केलेल्या तरतुदींच्या आधारे वक्फ बोर्डाकडे दिलेल्या अनियंत्रित शक्तिंमुळे आज देशातील जवळपास ९ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या घश्यात सोयीस्करपणे ढकलली गेली आहे.देशाच्या सुरक्षा आणि रेल्वे मंत्रालयानंतर सर्वाधिक जमिनीचा मालकी हक्क वक्फ बोर्डाकडे आहे.आपल्या आधीच्या पिढीकडून कळत नकळत झालेली ही चूक सुधारण्याची एक नामी संधी वक्फ अधिनियम २०२४ च्या निमित्ताने आपल्याकडे चालून आलेली आहे.देशाच्या संसदेत या विषयावर चर्चा होत असताना एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.ही समिती देशातील नागरिकांकडून वक्फ बोर्डाच्या संदर्भात त्यांची वैयक्तिक मते जाणून घेण्यासाठी इच्छुक असून त्यांनी त्या संदर्भात नागरिकांच्या सूचना,अभिप्राय आणि मते mail च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तर पोस्टच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने मागवली आहेत.
त्यामुळे वक्फ बोर्डासारख्या अन्यायकारक असंविधानिक प्रणालिविरोधात स्वतःच मत नोंदवण्यासाठी कृपया खालील पत्त्यावर आपले मत पोस्टाने नक्कीच पाठवावे.
सोबतच दिलेल्या mail id वर ऑनलाईन पद्धतीने आपले अभिप्राय आणि सूचना नक्कीच कळवाव्यात.
JOINT SECRETARY (JM), LOKSABHA SECRETARIAT, ROOM NO 440 , PARLIAMENT HOUSE ANNEXE, NEW DELHI -110001
FAX : 23017709
email ID: jpcwaqf-Iss@sansad.nic.in
जर वाचकांपैकी कोणी सविस्तर अभिप्राय देण्यास इच्छुक असेल तर त्यांनी सोबत जोडलेल्या छायाचित्रातील QR CODE स्कॅन करून आपले मत सरकारपर्यंत मेलने नक्कीच पोहोचवावे.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.