You are currently viewing 57yswk

57yswk

आज १४ ऑगस्ट अर्थात भारताच्या फाळणीचा काळा दिवस!सद्य परिस्थितीमध्ये बांगलादेशात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दिवसाची भयानकता अजून अधोरेखित होताना दिसत आहे.भारताच्या फाळणीला ७६ वर्षे होऊन गेली तरीसुद्धा त्याची भयानकता अजून कमी झालेली दिसत नाही.उलट ती कित्येक पटीने वाढलेली दिसते.आज आपल्या आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पाहिलं तरी आपल्याला त्याचं भयानक वास्तव नजरेस पडल्याशिवाय राहत नाही.अगदी आपल्या आजूबाजूला घराच्याबाहेरही आपल्या मुंबईत सुद्धा ही परिस्थिती आपल्याला आढळून येते.  

आज मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात लँड जिहादची अनोखी पद्धत वापरण्यात आलेली दिसून येते. मुंबईतील रिकाम्या जागांवर कब्जा करायचा, घुसखोरी करायची, तिथे छोटे मोठे व्यवसाय सुरू करायचे,आपली वस्ती वाढवायची, प्रार्थना स्थळ निर्माण करायची, मांस विक्री व इतर अन्नधिकृत व्यवसाय वाढवायचे, बाजूच्या वस्तीतील हिंदू महिलांना लक्ष करून त्रास द्यायला सुरुवात करायची. यामुळे भयभीत झालेला हिंदू तेथून पलायन करायला लागतो.मग त्या हिंदूंची जागा कमी किमतीत खरेदी करायची आणि संपूर्ण वस्ती मुस्लिम बहुल करायची. मालाडचा हा  ‘मालवणी पॅटर्न’ आज मुंबईत ठीक ठिकाणी राबविला जात असल्याचे आढळून येते. आज नाव शिवाजीनगर मानखुर्द पण गाव मात्र बांगलादेशी लोकांचं ही मुंबईची परिस्थिती झालेली आहे. तर या लँड जिहादला कोणी विरोध केला, तर त्याची अरविंद वैश्यसारखी धारावीमध्ये थेट पोलिसांसमोरच निर्घृण हत्या करायची,ही स्थिती अत्यंत भयावह आहे.

 त्याचबरोबर मुंबईमध्ये लव्ह जिहाद सुद्धा मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. जय भीम जय मीम चा नारा देऊन, दलित समाजाला गुंगी मध्ये ठेवून मोठ्या प्रमाणावर दलित समाजातील मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवणे हा इथला मोठा धंदा झाला आहे. चेंबूरमधील रूपाली चंदनशिवे आणि मानखुर्दमधील पुनम क्षीरसागरची हत्या या त्याचं ज्वलंत उदाहरण आहे.

 केवळ हे पुरेसं नाही म्हणून की काय, आज मुंबईच्या रस्त्यांवर आणि फुटपाथवर बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांनी बिनदिक्कतपणे, प्रशासनाला न जुमानता व्यवसाय थाटलेले आहेत. याने केवळ मुंबईला बकाल केलेलं आहे असं नव्हे तर इथल्या स्थानिकांना बेरोजगार देखील बनवलेलं आहे. हा एक प्रकारचा आर्थिक जिहादच आहे. आज आम्हाला कोणत्याही प्रकारची छोटी मोठी कामे करायची असतील किंवा काही छोटी-मोठी खरेदी करायची असेल, अगदी आमच्या सणावाराला धार्मिक कार्यक्रमाला आवश्यक साहित्य घ्यायचं असेल तरीसुद्धा या बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांच्या दुकानावर जावे लागते ही शोकांतिका आहे. आमच्या स्थानिक व्यापारांवर चालवलेली कुऱ्हाड आहे. Swiggy, Ola, Uber यांच्या माध्यमातून आज हा बांगलादेशी व रोहिंग्या आमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे.

     या सगळ्याचे परिणाम आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसले. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये व उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांनी एकगठ्ठा मतदान केलेले आढळते. हे केवळ मुंबईस नव्हे तर लोकशाहीस व संविधानास घातक आहे.

    या सर्व पार्शवभूमीवरून  मुंबई जिहाद्याच्या टार्गेटवर आहे का ?, मुंबई ज्वालामुखीच्या तोंडावर आहे का ? अशी भीती वाटायला लागते. यासाठी समस्त मुंबईकरानी यावर विचार करून, संगठीत होऊन मुंबईला बांगलादेश होण्यापासुन होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहणे,काळाची गरज आहे!

Share on Socials

Leave a Reply